शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई - चार महिन्यांच्या आत बेघरांना पक्की घरे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:46 AM

तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील,

ठळक मुद्देजलसंपदामंत्री गिरीश महाजन : तिवरेला दिली भेट

रत्नागिरी : तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कामथे येथे केले. सोबतच यातील मृत व्यक्तिच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चिपळूण तालुक्यात असणारे हे तिवरे धरण फुटले. समोरील बाजूस असणाऱ्या एका वाडीतील सुमारे पंधरा घरे वाहून गेली. यात २४ जण बेपत्ता असल्याचे सुरुवातीला कळाले होते. तथापी एनडीआरएफच्या बचाव पथकाने कृती करत एका व्यक्तिचा जीव वाचवला. त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीदेखील केली. तत्पूर्वी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यामध्ये ज्यांची घरे नष्ट झाली आहेत, अशा सर्वांची व्यवस्था सध्या एका शाळेत करण्यात आली आहे. त्यांना चांगल्या पद्धतीची मजबूत घरे चार महिन्यांच्या आत बांधून देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

मंगळवारी रात्री ही घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच सर्व अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते. शक्य त्या पद्धतीने जीव वाचवता येईल, अशा वाहून गेलेल्या व्यक्ती शोधण्याचे काम चालू होते. त्यानंतर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील पथक या मदत कार्यात सहभागी झाले. त्यानंतर मदत कार्याने वेग घेतला. तथापि संपूर्ण खडकाळ व मोठ्या दगडांची नदी असणाºया या पात्रात होडी व इतर साधने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष नदीपात्रात न फिरता मृतदेहांचा शोध सुरू झाला. हे धरण सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात भरण्याच्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने हे धरण फुटल्याचे सकृतदर्शनी दिसून आले.

याबाबत बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या धरणातील गळती होत आहे, अशी वारंवार तक्रार येत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांवर कारवाई निश्चितपणे केली जाईल. या कार्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल हे काल रात्रीपासूनच घटनास्थळावर पोहोचले होते. ज्यांचे जीव वाचवण्यात यश आले, अशा सर्वांची व्यवस्था याच गावालगत असणाºया एका शाळेत करण्यात आली आहे.

तक्रारी येऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे चुकीचे.दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील पथक मदत कार्यात सहभागी.प्रत्यक्ष नदीपात्रात न फिरता मृतदेहांचा शोध सुरू. धरण सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले. धरणक्षेत्रात जास्त पाऊस?

तिवरे धरण : सद्यस्थितीतिवरे धरण २000 साली बांधून पूर्ण झाले.२.४५२ दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे.धरण बांधल्यानंतर आजतागायत त्याची दुरूस्ती झालेली नाही.दोन वर्षांपूर्वी २0१७मध्ये कालव्याच्या मुख्य दरवाजापाशी गळती सुरू झाली. त्याबाबत ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली.१२ मे २0१९ रोजी पाटबंधारे खात्याच्या दापोलीतील अधिकाऱ्यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. चार दिवसात दुरूस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले.दि. ३0 मे रोजी कालव्याच्या दरवाजानजीक दुरूस्ती करण्यात आली. दगड आणि माती टाकून ही दुरूस्ती करण्यात आली.दुरूस्तीनंतर फक्त ३४ दिवसांनीच धरण फुटले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण