- शोभना कांबळेरत्नागिरी : अलीकडच्या काळात नागरिकांचा समाज माध्यमांच्या वापर वाढला आहे. म्हणूनच सर्व नागरिकांपर्यंत रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व जनजागृतीपर उपक्रमांची तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहचावी, यासाठी सध्या प्रभावी ठरेल, या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाच्या स्वतंत्र यु ट्यूब चॅनेलचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक डॉ. समाधान पाटील हेही उपस्थित होते.
रत्नागिरी पोलीस दल आता लोकाभिमुख होतेय. नागरिकांशी संवाद साधण्याचे समाजमाध्यम प्रभावी माध्यम असल्याने आता पोलिस दलामार्फत जनजागृतीसाठी राबविले जाणारे उपक्रमही फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व जनजागृतीपर उपक्रमांचा तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहचविण्याकरिता ट्यू ट्यूब चॅनेल हे प्रभावी असल्याने रत्नागिरी पोलीस दलातर्फे स्वतंत्र यु ट्यूब चॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन बुधवारी झाले.
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपुर्वीच सायबर क्राइम, रस्ते अपघात सुरक्षा, महिला सुरक्षा व ड्रिंक अँड ड्राइव टाळणे या जनजागृतीपर ४ चित्रफितींचे लोकार्पण करण्यात आले होते. या चित्रफितीही यावेळी दाखविण्यात आला.
अलीकडच्या काळामध्ये नागरिकांचा समाज माध्यमांच्या वापरावर अधिक कल आहे व याचाच एक भाग म्हणून सर्व नागरिकांपर्यंत रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व जनजागृतीपर उपक्रमांचा तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहचविण्याकरिता पोलिस दलाचे हे स्वतंत्र युट्यूब चॅनेल प्रभावी ठरेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. आता या यु ट्युूब चॅनेलद्वारे पोलिस दलाच्या सर्व उपक्रमांची माहिती तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पाेहोचवली जाणार आहे.
रत्नागिरी पोलीस दलाच्या स्वतंत्र यूट्यूब चॅनेलच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह, निशा जाधव, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, वैशाली अडकुर, विक्रांत पाटील तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते.