रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात १०४ रुग्णांची नव्याने भर पडली असल्याने आता एकूण रुग्णसंख्या ७५,१४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २,२६३ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. तर एकाच दिवसांत तब्बल ३६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्यांची संख्या ७१,७४१ (९५.४८ टक्के) इतकी आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार, १,५२७ कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी १,४८१ अहवाल निगेटिव्ह तर १०४ अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात आरटीपीसीआर चाचणीत ४६ आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत ५८ अहवाल पाॅझिटिव्ह आले. आतापर्यंत निगेटिव्ह अहवाल आलेल्यांची संख्या ६,३६,३८२ इतकी आहे.
मंगळवारी जिल्ह्यात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात मंगळवारी ३ आणि त्यापूर्वीच्या दोन रुग्णांच्या समावेश असून यात गुहागर आणि संगमेश्वरमधील प्रत्येकी १ आणि चिपळूणमधील ३ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १,८९७ रुग्ण ५० व त्यावरील वयोगटातील असून सहव्याधी असलेल्या ८०६ जणांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात १,०६० रुग्ण विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी गृह विलगीकरणात ५६५ आणि संस्थापक विलगीकरणात ४९५ रुग्ण उपचार घेत आहेत. डीसीएचसीमध्ये १२१, डीसीएचमध्ये १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी १२३ जणांना ऑक्सिजन सुरू असून ६६ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
गेल्या आठवड्यातील मृत्यू दर ३.६६ इतका होता तर मंगळवारी एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेने ०.४७ इतका आहे.