रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४६ नवीन रूग्णांची भर पडली असून, तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७१ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ७६,३३२ इतकी असून, २३५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२,७३५ रूग्ण बरे झाले आहेत.
रविवारी आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरमध्ये १९ ॲटिजन चाचणीत २७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. शनिवारी २ व त्या आधीचा एक असे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एकाचा रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूपैकी ५० व ५० पेक्षा जास्त वयोगटांतील मृत्यूंची संख्या १९७५ आहे. एकूण मृत्यूपैकी आजारपण असलेले मृत्यू ८२७ आहेत. कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ७०४ असून, लक्षणे असलेले रुग्ण २९८ आहेत.
जिल्हा रुग्णालयाने केलेल्या अहवानुसार १,८८९ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोना चाचण्यांमध्ये ७६३३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत तर तब्बल ६ लाख ७७ हजार ९६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.