राजापूर : अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे राजापूर नगर परिषद हद्दीतील नुकसान झालेल्या विकासकामांना निधी मिळणेसाठी आमदार राजन साळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे प्रस्ताव दिले हाेते. या प्रस्तावातील राजापूर नगरपरिषद हद्दीतील रुपये २ कोटी विकासकामांना विशेष अनुदान योजनेंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
आमदार राजन साळवी यांनी अतिवृष्टीमुळे राजापूर नगर परिषद हद्दीतील नुकसान झालेल्या विविध विकासकामांचा शिवसेनेचे गटनेते विनय गुरव व नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या माध्यमातून विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर अत्यावश्यक ठिकाणांची प्रस्तावित केलेल्या कामांमधील जवाहर चौक ते वरची शिवाजी पथ रस्ता काॅंंक्रिटीकरण, राजापूर बौध्दवाडी सतीश जाधव घराजवळील कोसळलेली नगर परिषद रस्त्याची संरक्षक भिंत व जवाहर चौक पूल ते आंबेवाडी जॅकवेलपर्यंतचा रस्ता, नगरपरिषद हद्दीतील गुरववाडी विभागातील नागरिकांच्या वापरातील गणेश विसर्जन घाट दुरुस्त करणे या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे.