रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस फौजदार ते पोलीस हवालदार या पदाच्या २८ जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले. आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामध्ये सहायक पोलीस फौजदार ते पोलीस हवालदारांचा समावेश आहे.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जाचा विचार करून आणि प्रत्यक्ष समुपदेशनाद्वारे बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिले आहेत. या बदल्यांमध्ये चिपळूण पोलीस स्थानकातील सहायक पोलीस फौजदार जितेंद्र घाणेकर यांची खेडला, रत्नागिरी मुख्यालयातून पोलीस हवालदार राजेंद्र भाटकर यांची रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात, खेड येथील हवालदार भूषण सावंत यांची दापोली पोलीस स्थानकात, जयगड येथील संदीप साळवी यांची रत्नागिरी ग्रामीणला, खेड येथील विजय येलकर यांची चिपळूण पोलीस स्थानकात, पूर्णगड येथील पृथ्वीराज देसाई यांची बाणकोट पोलीस स्थानक, नियंत्रण कक्षाचे मुकुंद महाडिक रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात, जिल्हा मुख्यालयातून जितेंद्र साळवी लांजा पोलीस स्थानकात, चिपळूण येथील सुजाता मोहिते यांची सावर्डे पोलीस स्थानकात बदली करण्यात आली.
तसेच मुख्यालयातून विजय तोडणकर यांची संगमेश्वर पोलीस स्थानक, दापाेलीतील मोहन कांबळे यांची रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक, पूर्णगड येथील घन:श्याम जाधव यांची रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक, तर भालचंद्र रेवणे यांची लांजा, रत्नागिरी ग्रामीणचे विजयकुमार चावरे यांची लांजाला, जिल्हा विशेष शाखेतील उत्तम पिलणकर यांची नाटे पोलीस स्थानक, देवरूख येथील दत्ताराम बाणे मंडणगड पोलीस स्थानक, स्थानिक गुन्हे शाखेतून संदीप कोळंबेकर जिल्हा विशेष शाखा, जिल्हा मुख्यालयातील सौरभी कांबळे यांची रत्नागिरी शहर पोलीस स्थानक, रत्नागिरी ग्रामीणहून नीता बेंड्ये पोलीस मुख्यालयात, सावर्डे येथील दीपक करंजकर राजापूर पोलीस स्थानक, जिल्हा विशेष शाखेतून समीर सावंत यांची पोलीस मुख्यालयात, पाेलीस मुख्यालयातील संजय भारती यांची जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखेतील सुरेंद्र शिंदे यांची संगमेश्वर पोलीस स्थानक, अलाेरे येथील स्वप्निल साळवी यांची खेड पोलीस स्थानक, खेड येथील नरेंद्र चव्हाण अलोरे पोलीस स्थानक, चिपळुणातील संदीप नाईक यांची पूर्णगड पोलीस स्थानक, संगमेश्वरातील विद्या साळवी यांची पूर्णगड पोलीस स्थानक, चिपळूण येथील अशोक पवार यांची अलोरे पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.