शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Parashuram Ghat: अखेर एका महिन्यानंतर परशुराम घाटामधील वाहतूक पूर्ववत सुरू, काम सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:54 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक महिनाभर दिवसातून ५ तास बंद ठेवली होती.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक महिनाभर दिवसातून ५ तास बंद ठेवली होती. मात्र, गुरुवारपासून पूर्णवेळ नियमित वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, एकाबाजूला डोंगर कटाईसह चौपदरीकरणाचे कामही सुरू ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवले जाणार असून, घाटात महिनाभर असलेला पोलीस बंदोबस्तही हटविण्यात आला आहे.

परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी, यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या दरम्यान ५ तास वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. या कालावधीत पूर्ण क्षमतेने चौपदरीकरणाचे काम सुरू होते. त्यातून बहुतांशी  ठिकाणी डोंगर कटाईचे काम पूर्णत्वाला गेले आहे. ईगल कंपनीने डोंगर कटाई सुरू ठेवलेली असतानाच ७०० मीटरपर्यंतचे रस्ता काँक्रिटीकरणही पूर्ण केले आहे.

याचपद्धतीने खेड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीचे अवघड टप्प्यात काम सुरू आहे. त्यासाठी बेंचिंग पद्धतीने डोंगर कटाई केली असून, दरडी कोसळण्याचा धोका कमी केला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात वाहतूक सुरू असताना उर्वरीत डोंगर कटाईचे काम सुरू ठेवले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम नियमितपणे सुरू ठेवले जाणार आहे.

घाट बंद असताना महामार्गावरील वाहतूक कळबंस्ते ते चिरणीमार्गे वळविण्यात आली होती परंतु, यामार्गे मोठा वळसा घेऊन जावा लागत असल्याने वाहतूकदार हैराण झाले होते तसेच कळंबस्ते येथील रेल्वे ट्रॅक, आंबडस (खेड) येथील अरूंद व धोकादायक पूल, खचलेल्या साईड पट्ट्यामुळे या मार्ग धोकादायक होता. त्यामुळे घाट सुरू होण्याबाबत एस. टी. महामंडळासह लोटेतील कामगारांनाही उत्सुकता होती. अखेर जिल्हाधिकारी यांनी २५ मे रोजी घाट नियमितपणे सुरू ठेवण्याचे संकेत देताच दोन्ही बाजूला ठेवलेला पोलीस बंदोबस्त गुरुवारपासून हटविण्यात आला.

पाण्यासाठी मार्गवाहतूक सुरू केली असली तरी चाैपदरीकरण सुरुच राहणार आहे. जेथे खडक लागला आहे, तेथे तीन ते चार ड्रील मशीन लावून कामाचा वेग वाढविला आहे. तसेच रस्त्यालगतचे दगड व माती हटवून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चरही खणले जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी