शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

सत्तार म्हणाले, "आता पदवी मिळाली; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत," चूक लक्षात येताच सावरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:32 PM

विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. त्यावेळी सत्तार उपस्थित होते.

रत्नागिरी : आता पदवी मिळाली आहे; पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे विधान विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, आपली काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे लगेचच सावरून घेत राज्य सरकार आता ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. त्यात सर्वांना नोकरी मिळेल, असे सांगितले. मात्र, त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या दापोली येथील डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. प्र-कुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इम्फाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन, रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच आमदार योगेश कदम, कुलसचिव डॉ. भरत साळवी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी शरद पवार हेही यावेळी उपस्थित होते.

देशात शहरीकरणाचा जोर वाढत असला तरी शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे, येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील, असे राज्यपालांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादनांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असेही सत्तार म्हणाले.

राज्यपालांकडूनही मार्गदर्शनया समारंभात ३४ पीएच. डी., १०५ पदव्युत्तर पदवी आणि २१०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केले.

जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे, असे डॉ. एस. अय्यपन यांनी यावेळी सांगितले. कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. पदवीदान सोहळ्यापूर्वी राज्यपाल बैस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरी