दापोली : विद्यापीठात झालेले संशोधन कार्य अत्यंत मोलाचे असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसोबत जीवनस्तर उंचाविण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अपर मुख्य सचिव (कृषी) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षक व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू, डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्रमणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते.चारही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात त्या- त्या विद्यापीठातील संशोधन अवजारे बी बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली.यानिमित्त दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात चारही कृषी विद्यापीठाचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
कृषी विद्यापीठातील संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस लाभ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार
By अरुण आडिवरेकर | Published: December 14, 2022 6:47 PM