दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर राष्ट्रव्यापी उपोषण सुरू केले आहे. अँटी करप्शन कमिटी एलियस भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.कोकण कृषी विद्यापीठातील कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे. या कामगारांनी यापूर्वी वेळोवेळी उपोषण व आंदोलनसुद्धा केले होते. मात्र, त्यांना केवळ आश्वासने दिली जात होती. अखेर सर्व कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून हे उपोषण सुरू करण्यात आले.दापोलीतील कामगारांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समिती राज्य अध्यक्ष यलप्पा पोवार, कोकण विभाग अध्यक्ष तानाजी पोवार, कामगार अध्यक्ष दत्तात्रय भुवड, नंदकिशोर कोठावडे, सुनील भुवड यांच्यासह मजूर, भ्रष्टाचार निर्मुलनचे कार्यकर्ते दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्ते कामगार पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कृषिमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.
कृषी विद्यापीठाच्या कामगारांचे दिल्लीत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:02 PM
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर राष्ट्रव्यापी उपोषण सुरू केले आहे. अँटी करप्शन कमिटी एलियस भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकृषी विद्यापीठाच्या कामगारांचे दिल्लीत उपोषणकृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी आंदोलन