दापोली : मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज हे सहा स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करून सर्वसाधारण सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले आहे.
महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये सुगम संगीत प्रकारात तन्वी गुरव हिने प्रथम क्रमांक पटकावला. मिमिक्री प्रकारामध्ये रोहन करकरे, तर कार्टुनिंग प्रकारामध्ये मुस्कान चिपळूणकर हिने पहिला क्रमांक पटकावला.
कथाकथन स्पर्धेत रुख्सार ममतुले, शास्त्रीय संगीत प्रकारात ऋतुजा ओक, ऑन द स्पॉट पेंटिंग प्रकारात अनघा जोशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाने एकूण नऊ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यापैकी सहा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
सर्व स्पर्धकांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साळवी, सदस्य प्रा. विश्वेश जोशी, प्रा. प्रिया करमरकर, प्रा. मुग्धा कर्वे, प्रा. श्रुती आवळे, प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. संतोष मराठे, प्रा. कैलास गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धकांच्या यशस्वी सहभागासाठी प्रा. शंतनु कदम, प्रा. सदानंद डोंगरे, प्रा. स्वप्निल साळवी यांनी तांत्रिक साहाय्य केले. यशस्वी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन केदार साठे, सचिव डॉ. प्रसाद करमरकर व संचालक सौरभ बोडस यांनी अभिनंदन केले आहे.