लोकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र अजित गोरुले यांची महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता मराठी भाषेचे संरक्षण करणे तसेच मराठी लोकांच्या हक्कासाठी लोकचळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. मराठी एकीकरण समिती भाषासंवर्धन, संरक्षण आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी गेली अनेक वर्षे गोरुले हे काम करत आहेत. मातृभाषा मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यात कामाच्या ठिकाणी जर मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर त्याठिकाणी येवून मार्ग काढीन, असे आश्वासन अजित गोरुले यांनी दिले. यावेळी कार्याध्यक्ष धमेंद्र घाग, कोषाध्यक्ष अमोल रणदिवे, दिलीप घाग, मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.