चिपळूण : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोटतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘झाडे लावा, झाडे जगवा’ तथा ‘निसर्ग माझा सोबती’ या विषयावर राज्यस्तरीय स्वरचित ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयाेजन सुरू केले हाेते. या स्पर्धेत आठवीतील अलिना झहीर झिंगू हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे आयोजन व नियोजन विद्यालयातील माध्यमिक शिक्षक योगेश पेढांबकर यांनी केले होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांक रुषदा शमशुद्दीन परकार, तृतीय क्रमांक मुईज समीर दळवी, उत्तेजनार्थ क्रमांक नायला नबील मिठागरी यांनी मिळविला. यशस्वी स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उरुसा खतीब, काशिफ काझमी, मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.