पाली : रत्नागिरी तालुक्यातल पालीतील प्रसिद्ध भाजीविक्रेते धनंजय सुभाष कोतवडेकर (३९) यांचे कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रथम आई आणि त्यानंतर मुलगा असा मायलेकरांचा मृत्यू झाल्याने पालीवासीय सुन्न झाल्याने पालीवासीय सुन्न झाले आहेत.
धनंजय कोतवडेकर यांचे पाली बाजारपेठेत भाजीचे मोठे दुकान होते. लहान वयापासून पाली बाजारपेठेत भाजीचे मोठे दुकान होते. लहान वयापासून या व्यवसायात पडल्याने विभागातील सर्वच गावातील नागरिकांशी त्यांचा थेट संबंध होता. प्रत्येक गावातील वाडी-वाडीतील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.
तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. याच कालावधीत त्यांच्या मातोश्रींनाही लागण झाली. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. धनंजय यांच्या तब्बेतीत चढउतार होत असल्याने त्यांना कोल्हापुरातील एका रुग्णालयात दाखल केले. येथे ते पावणे तीन महिने त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, वडील. बहिणी, मेहुणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांना श्रद्धांजली म्हणून पाली व्यापारी संघटनेने आपली दुकाने बंद ठेवली होती.