दापोली : दिवसेंदिवस भातशेती खर्चिक होऊ लागल्याने उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक खर्च शेतकऱ्याला मजुरीवर करावा लागत आहे. त्याचबरोबर कवळतोडणी भाजणीपासून ते रोप लावणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मजुरीचा वाढलेला दर, उत्पन्न याचा ताळमेळ घातल्यास भातशेती शेतकऱ्याला फायेदशीर नसल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने भातपेरणी करुन कमी खर्चात उत्पन्न घेण्याचा पर्याय दिला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून भाताचे नवनवीन वाण विकसित करुन शेतकऱ्याला चांगला फायदा होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु अलीकडे मजुरांचा अभाव ही शतेकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे वाढलेले दर भातशेतीतील ४ महिने केला जाणारा मेहनतीचा कालावधी पाहता भातशेती शेतकऱ्याला खर्चिक आहे. कवळतोडणी, भाजणी, रान तयार करुन पेरणी, रोपे तयार करुन नांगरणी, चिखलणी, रोपे लावणी ही सर्व कामे भातशेतीत करावी लागतात.सर्व खर्च जावून शेतकऱ्याच्या हातात केवळ पेंढा शिल्लक राहील एवढेच उत्पन्न शिल्लक राहाते. भविष्यात याकडे दुर्लक्ष होऊ शकते. भातशेतीचा खर्च पाहता अनेकजण भातशेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गादी वाफे करुन थेट पेरणी केली आहे.पेरणी केल्यामुळे भातासाठी इतर कामावर होणाऱ्या खर्चाची बचत होते. ४ बाय ४ फुटाच्या गादीवाफ्यावर पेरणी करुन उत्पन्न घेण्याचा सोपा पर्याय कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे. या पद्धतीने मजुरीचा खर्च कमी होतो व थेट पेरणी केल्यामुळे भातपीक लवकर येते. कृषी विद्यापीठाच्या या शास्त्राचा फायदा गावागावात पोहोचल्यास मजुरांची भासणारी टंचाई दूर होणार आहे. त्यामुळे भातशेतीचा सध्या नुकसानीत असलेला प्रयोग प्रथमच फायद्यात बदलणार आहे. शेतीसाठी हे नवे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकणार आहे. (प्रतिनिधी)भविष्यातील मजुरांची समस्या लक्षात घेवून काळानुरुप बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्याला भातशेती कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.डॉ.उत्तमकुमार म्हाडकरसंशोधन संचालक
भातशेतीच्या मजुरीला आळा घालण्याचा कृषी विद्यापीठाचा पर्याय
By admin | Published: September 11, 2014 10:19 PM