रत्नागिरी : गेले वर्षभर संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली होती. मात्र त्याला पकडण्यात यश आले नव्हते. गुरुवारी येथील ग्रामस्थ घडशी यांच्या पाच बकऱ्यांवर झडप घातली. यातील तीन बकऱ्या त्याने ठार केल्या. तर दोन बकऱ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.शुक्रवारी बिबट्याने ठार केलेल्या बकऱ्या त्याच जागेवर ठेऊन देण्यात आल्या. त्याचबरोबर तेथे पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी ग्रामस्थ झाडावर दबा धरुन बसले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला बकऱ्यांच्या वासाने बिबट्या त्या ठिकाणी आला. बिबट्या येताच ग्रामस्थांनी झाडावरुन उड्या मारुन त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. त्यानंतर वनखात्याला माहिती देऊन बिबट्याला त्यांच्या ताब्यात दिले. रात्री उशीरा जवळच्या जंगलात सोडून दिले. त्यामुळे पुन्हा बिबट्या गावात येण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी दुपारी जेरबंद करण्यात आले. बकऱ्यांच्या शोधासाठी आलेला हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आंबव पोंक्षे येथे गेले वर्षभर बिबट्या ग्रामस्थांना त्रास देत होता. रात्री उशीरा हा बिबट्या तेथीलच जवळच्या जंगलात सोडून देण्यात आला. -वृत्त/५
आंबव पोंक्षे येथे बिबट्या पकडला
By admin | Published: April 29, 2016 11:31 PM