पावस : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक संतोष कडवईकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपशिक्षक शंकर वरक, चंद्रशेखर पेटकर, स्नेहल कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी विनित खरडे, क्रिश कुरतडकर, गणेश कुरतडकर, नीलिमा अभ्यंकर यांची उपस्थिती लाभली होती. जयंतीचे औचित्य साधून मेर्वी शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, काव्यवाचन, ऑनलाइन व्हिडिओ अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच सातवीचे विद्यार्थी क्रिश कुरतडकर आणि विनित खरडे या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आपले संविधान’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. उपशिक्षक शंकर वरक यांनी आभार मानले.