चिपळूण : वृद्ध आईवर मुलाने कोयतीने वार केला असून, यात ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२१) घडली. इतकेच नव्हे तर पतीसह सुनेनेही तिला मारहाण केली. या तिघांवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्ताराम वाजे, अजय दत्ताराम वाजे, अनघा अजय वाजे (सर्व रा. वाजेवाडी-मालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सुलोचना दत्ताराम वाजे (७०, रा. वाजेवाडी - मालघर) यांनी दिली. सुलोचना वाजे यांचे पती दत्ताराम वाजे, मुलगा अजय वाजे व सून अनघा वाजे यांच्यात मालघर येथील नवीन घराच्या मालकी हक्कावरून वाद आहेत. दत्ताराम, अजय व अनघा वाजे हे तिघेजण वडिलोपार्जित घरामध्ये राहतात. सुलोचना वाजे या घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरामध्ये राहतात. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुलोचना या घरी जेवण करत असताना घराच्या दरवाजातून दत्ताराम, अजय व अनघा वाजे या तिघांनी शिवीगाळ केली. तसेच घरामध्ये येऊन घराचा दरवाजा लावून घेत दत्ताराम याने सुलोचना यांना ओढत आणून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काेयतीने वार करून जखमी केले. यावेळी ठार मारण्याची धमकी दिली.
जमीन वादातून वृद्ध आईवर मुलाने केला कोयतीने वार, रत्नागिरीतील मालघर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:29 PM