रत्नागिरी : दुचाकी विक्रीची बतावणी करत ५२ हजार ६४० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (१३ एप्रिल) सायंकाळी ५:३० ते रविवारी (२३ एप्रिल) दुपारी १२:५२ वाजण्याच्या दरम्यान घडली. आकाश अनंत कुलकर्णी आणि नितिष कुमार अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांनी फेसबुकवर सफेद रंगाची अॅक्टिव्हा दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीखाली दिलेल्या मोबाइल नंबरवर त्यांनी फोन केला. आकाश कुलकर्णी याने आपण सोलापूर येथून बोलत असल्याचे सांगून दुचाकीची माहिती देत ती विकायची असल्याचे त्यांना सांगितले.त्यानंतर आकाशने दुचाकीची डिलिव्हरी देणाऱ्या नितीष कुमारच्या गुगलपेचा क्युआर कोड फिर्यादी यांना पाठवून त्यावर दुचाकीची रक्कम पाठवण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी आपल्या पत्नीच्या बँक खात्यातून ऑनलाइन पध्दतीने संशयितांना ५२,६४० रुपये पाठवले. परंतू त्यानंतरही फिर्यादींना दुचाकी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार २४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 6:19 PM