राजापूर : अणसुरे पंचायत समिती गणातील जैतापूर, अणसुरे, होळी, वाघ्रण, साखरकोंबे येथील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सुमारे ३०० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत स्वागत केले. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक डोळयासमोर ठेवून राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे, उपविभागप्रमुख मंगेश मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर व मुंबई शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी या दृष्टीने रणनीती आखली होती. सागवे येथे राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ व प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे विभाग अध्यक्ष गिरीश कनगुटकर यांच्या नेतृत्त्वाखाली सुनील कनगुटकर, वाघ्रणचे नितीन राणे, विलास राणे, मयुरी राणे, दीपिका राणे, होळी येथील सुनिता गुरव, सुरेखा गुरव, बाळकृष्ण बाणे, साखरकोंबेचे मनोहर धुरी, अणसुरेचे रमेश सावंत आदींसह ३०० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही तरुण कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार गणपत कदम, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, पंचायत समिती सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, महिला उपजिल्हा संघटक मंदा शिवलकर, जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, विभागप्रमुख राजा काजवे, उपविभागप्रमुख मंगेश मांजरेकर, अनिल नाणारकर, विद्या राणे, जैतापूर सरपंच शैलजा मांजरेकर, पंचक्रोशीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अणसुरेत काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार
By admin | Published: October 01, 2016 11:46 PM