शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

Ratnagiri: मंडणगडात खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती, टाकेश्वर मंदिराच्या इमारतीचे नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:52 PM

मूर्ती संरक्षित करणार

मंडणगड : तालुक्यातील टाकवली येथील पांडवकालीन टाकेश्वर मंदिराच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मंदिर परिसरात खोदकाम करताना वीरगळ, सतीची शीळ व पांडवकालीन मंदिराचे भग्न अवशेषही सापडले आहेत. या अवशेषांमुळे मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाच्या भूतकाळातील खुणांचा अभ्यास करता येणार आहे.टाकवली येथे भगवान शिवशंकरांचे पुरातन टाकेश्वर मंदिर आहे. यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने इमारतीच्या बाजूने जुने बांधकाम तसेच ठेवून आरसीसी बांधकाम करून मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामात कोकणातील मंदिराच्या परिसरात सापडणाऱ्या काळ्या दगडावर कोरलेल्या मूर्तीचे दोन नमुने सापडले आहेत. यात वीरांच्या स्मरणात काळ्या दगडावर कोरण्यात येणारी वीरगळ व युद्धानंतर सती जाणाऱ्या स्त्रियांच्या स्मरणातील सती शिळाही आढळली आहे.

टाकवली येथील शंकराचे मंदिर हे सर्वात जुने म्हणजे पांडवकालीन असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे. याशिवाय मूर्ती संदर्भातही गुराखी व गाईची आख्यायिका सर्वमान्य आहे. या संदर्भातील लोकमान्यता व उपलब्ध माहितीचे संदर्भ जोडता पांडवाच्या आधीही येथे शंकराची मूर्ती व मूर्तीच्या संरक्षणाकरिता मंदिर असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. दोन भिन्न कालखंडातील धागे एकमेकांशी जुळवत या संदर्भातील विश्वसनीय माहिती पुढे आणण्यासाठी या मूर्तीचे संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मूर्ती संरक्षित करणारटाकेश्वर मंदिराच्या परिसरात खाेदकाम करताना सापडलेल्या मूर्ती मंदिरात ठेवून त्यांचे जतन करण्यात येणार आहे. हा प्राचीन पुरातन ठेवा येणाऱ्या पिढीस पाहता यावा, त्यातून आपली संस्कृती समजवून घ्यावी या उद्देशाने या मूर्ती संरक्षित करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी