रहिम दलाल - रत्नागिरीजिल्ह्यातील सुमारे ९५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत़ त्यामुळे या अंगणवाड्यांतील मुले शाळा, मंदिरे आणि घरांच्या पडवीचा आसरा घेतात़ त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तर इमारती नसल्याने त्या अंगणवाडी सेविकांना बालकांसाठी कसरत करावी लागते़अंगणवाडीच्या इमारतींसाठी शासन निधी देण्यास तयार आहे़ मात्र, जमिनींचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील कोणीही या अंगणवाड्यांसाठी बक्षीसपत्राने जागा देण्यास तयार होत नाही़ त्यामुळे शासनासमोर अंगणवाड्या सुरु केल्यानंतर इमारतींचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे़ या अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी साडेचार लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात येत होता़ मात्र, त्यामध्ये या निधीमध्ये वाढ करुन तो सहा लाख रुपये करण्यात आला आहे़ गतवर्षी आॅगस्ट महिन्यात साडेचार लाख रुपये प्रमाणे ४१ अंगणवाड्यांसाठी ३ कोटी ८२ लाख ५ हजार रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आले होते़ त्यानंतर अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ६० प्रस्ताव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते़ त्यापैकी आचारसंहितेपूर्वी ४१ अंगणवाड्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : मंडणगड २, खेड २, चिपळूण ५, गुहागर २, संगमेश्वर ८, रत्नागिरी १०, लांजा ३ व राजापूर १४ अशी आहे. या प्रत्येक अंगणवाडीसाठी ६ लाख रुपयेप्रमाणे २ कोटी ७६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ या अंगणवाड्यांच्या इमारतींना लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूरी मिळाली होती़ मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने ही कामे मंजूर असूनही आता ती कामे करण्यात आली नव्हती़ मात्र, त्यानंतर आता काही अंगणवाड्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत़
अंगणवाड्यांना आसरा मंदिरात
By admin | Published: July 21, 2014 11:23 PM