रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १४ रूग्ण वाढले - रुग्णांची संख्या १७५ - मृतांची संख्या ५
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा १७५ वर पोहोचला़ त्यातच मंगळवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील कोरोनाबाधीत प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता मृतांची संख्या पाच झाली आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेला माळवाशी येथील ६१ वर्षीय रुग्ण १८ मे रोजी मुंबईतून आला होता़ ते आजारी असल्याने त्यांना दुसऱ्याच दिवशी १९ मे रोजी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तब्येत आणखीच बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते़ ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दोन दिवसांनी २१ मे रोजी जिल्हा रुग्णालयाता प्राप्त झाला होता़ उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.मंगळवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला १७ जणांचे अहवाल प्राप्त झाले़ त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यामध्ये कामथे येथील ६ तर राजापूर येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये कामथे येथील १ अहवाल निगेटिव्ह आला असून अन्य २ नमुन्यांचा निष्कर्ष अजून आलेला नाही़ आत्तापर्यंतची रूग्णसंख्या आता १७५ झाली आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईकरांचाच समावेश आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.