रत्नागिरी : जिल्ह्यात २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०,२९८ झाली आहे. ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९,७७२ झाली आहे.
जिल्ह्यात ४९१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील २४ रुग्ण आणि ॲन्टीजेन तपासणीतील ४ रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी ७ रुग्ण, खेडमधील ११ रुग्ण आणि दापोली, संगमेश्वर, मंडणगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गृह अलगीकरणामध्ये ५९, तर वेगवेगळ्या रुग्णालयात ११९ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांची संख्या ३७० असून, त्यांचे प्रमाण ३.५९ टक्के आहे.