रत्नागिरी : कोकणरेल्वे मार्गावर अजून एक विशेष पार्सल ट्रेन ओखा ते तिरुवनंतपुरम अशी धावणार आहे. ही गाडी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहे. या ट्रेनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाणार आहे. ही गाडी मंगळवारी ओखा येथून दुपारी १.१० वाजता सुटणार आहे.ही गाडी ६ मे रोजी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर सकाळी ११.१० वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर कणकवली स्थानकावर १.४० वाजता, मडगांव जंक्शन स्थानकावर ४.५० वाजता आणि उडपी स्थानकांवर रात्री ९.१० वाजता येणार आहे. ही गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी ७ मे रोजी दुपारी १२ वाजता येणार आहे. तसेच या गाडीची परतीची गाडी नं. ००९३४ ही तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरून ७ मे रोजी रात्री ११ वाजता सुटेल व ८ मे रोजी उडपी स्थानकावर दुपारी १.२०, मडगांव जंक्शन स्थानकावर सायंकाळी ६.१० वाजता, कणकवली स्थानकावर रात्री ८.५० वाजता, रत्नागिरी स्थानकावर ११.१० वाजता येणार आहे. ही गाडी ओखा स्थानकांवर तिसºया दिवशी ९ मे रोजी रात्री ९.४० वाजता पोहोचणार आहे.ही गाडी रामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी, मेंगळूर जंक्शन, कन्नूर, केलीकट, शोरनूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्याम, कोल्लम जंक्शन या स्थानकांवर व्यावसायिक थांबा घेणार आहे. या स्थानकांवर जर आपल्याला आपले पार्सल पोहोचवायचे असल्यास आपण रत्नागिरी, कणकवली, मडगाव जंक्शन, उडपी या स्थानकावरील पार्सल आॅफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.