रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गुरूवारी सकाळी शहरातील मारूती मंदिर परिसरात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी सर्वांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. तर अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत होती.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, बुधवारी ३२४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. तर ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपासून निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी घरपोच सेवा देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शहरातील चौका चौकात पोलीस तैनात करून प्रत्येकाची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसान जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांनी बॅरिकेटस लावून तपासणी सुरू केली आहे. तर गुरूवारी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र यांनी सकाळपासूनच प्रत्येकाची तपासणी करण्यास सुरूवात केली होती.रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून तो कोठे चालला आहे, ओळखपत्र आहे का, याची माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर अनावश्यक फिरणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टीजेन तपासणी करण्यात येत होती. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांनाही ॲन्टीजेन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे मारूती मंदिर परिसरात चाचणीसाठी नागरिकांची रांग लागली होती.
रत्नागिरीत अनावश्यक फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 1:13 PM
CoroanVirus Ratnagiri : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गुरूवारी सकाळी शहरातील मारूती मंदिर परिसरात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी सर्वांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. तर अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत होती.
ठळक मुद्देमारूती मंदिर परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनातप्रत्येकाची केली जातेय तपासणी, नियमांची कडक अंमलबजावणी सुरू