रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबालाही अलिबाग येथील लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यांना २० मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबाग येथील लाचलुचपत विभागाने नोटीस बजावली आहे. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांच्या वडिलोपार्जित व राहते घर आणि हाॅटेलची मोजमाप करण्यात आली होती. आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीने नोटीस बजावली आहे.ही दुर्दैवी बाब आहे. सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे. उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार आहेत. त्यांनाच नोटीस पाठवल्या जात आहेत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असे आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे.
आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबालाही लाचलुचपत विभागाची नोटीस
By अरुण आडिवरेकर | Published: March 16, 2023 11:31 AM