चिपळूण : तालुक्यातील ओवळी येथील कोरोनाबाधित रुग्ण आता बरे झाले आहेत. मात्र, गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण गावातील कुटुंबांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४० जणांची ॲन्टिजन चाचणी केली असता, एकही बाधित रुग्ण मिळाला नाही. त्यामुळे ग्राम कृती दल तसेच आरोग्य विभागालाही दिलासा मिळाला आहे.
तालुक्याच्या टोकाला सह्याद्रीच्या पायथ्याशी ओवळी गाव वसलेले आहे. सुरुवातीपासून येथे कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. गाव कोरोनामुक्त राहण्यासाठी ग्रामस्थांसह ग्राम कृती दलाने प्रयत्न केले होते. तरीही गावात बाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे गावात बाधित असलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचे ठरले. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुबांची ॲन्टिजन चाचणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओवळी येथे ॲन्टिजन चाचणी केली. यावेळी ४० लोकांची चाचणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. यावेळी सरपंच शेवंती पवार, उपसरपंच दिनेश शिंदे, केशव कदम, निकिता शिंदे, संपदा बोलाडे, माधवी शिंदे, दीपिका शिंदे, ग्रामसेवक एस. बी. म्हापार्ले, दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका अर्चना सुर्वे उपस्थित होते.
080721\img-20210708-wa0010.jpg
ओवळीत आरोग्य विभागातर्फे अॅन्टीजेन चाचणी