साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील मुर्शी चेकनाका येथील अँटिजन केंद्रावर प्रवाशांची चाचणी करूनच साेडण्यात येत आहे. आतापर्यंत या ठिकाणी २१४७ प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातील १६ प्रवासी पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना आलेल्या ठिकाणी पुन्हा पाठविण्यात आले आहे.
रत्नागिरी-काेल्हापूर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. घाटमाथ्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा हा मार्ग असल्याने या मार्गावरून भाजी, दूध यासारखी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावरील मुर्शी नाक्यावर तपासणी केंद्र सुुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर प्रत्येक वाहनातील प्रवाशांची माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमुळे साखरपा प्राथमिक आराेग्य केंद्रावरील ताण कमी झाला आहे. कर्मचाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटिव्ह आढळल्यास त्यांना पुन्हा पाठवून दिले जात आहे. या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंकिता माने, आरोग्य सेवक संजय मांडवकर कार्यरत आहेत.
----------------------------
रत्नागिरी-काेल्हापूर मार्गावरील मुर्शीनाका येथे प्रवाशांच्या काेराेना तपासणीसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे.