पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती जानकीबाई शेट्ये कन्या छात्रालय व किसान छात्रालय, पाचल येथे दि. २० जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.
कन्या छात्रालय हे विशेषतः मागासवर्गीय मुलींसाठी आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना येथे प्रवेश देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास, अपंग, आर्थिक मागास प्रवर्गातील मुली यासाठी प्रवेश अर्ज करू शकतात. तसेच किसान छात्रालय हे विशेषतः इतर मागासवर्गीय मुलांसाठी आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांना याठिकाणी प्रवेश देण्यात येईल. यासाठी इतर मागास, अनुसूचित जाती, अपंग, आर्थिक मागास प्रवर्गातील मुले प्रवेश अर्ज करू शकतात. दोन्ही छात्रालयांचे प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, चिटणीस रामचंद्र वरेकर, अधीक्षक शैलेश हुदंळेकर यांच्याशी संपर्क साधावा.