आरवली : व्याजी धंदेवाले सावकार तुम्हाला अव्वाच्या सव्वा व्याज घेऊन पिळवणूक करत असतील, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जनतेला केले आहे.
आंदोलनाचा इशारा
आरवली : माखजन बसस्थानकातून सुटणाऱ्या पेढांबे या दुर्गम भागातील मार्गावरील व अन्य ग्रामीण जाणाऱ्या एस. टी. बस फेऱ्या तात्काळ देवरुख आगाराने चालू कराव्यात अन्यथा माखजन बसस्थानकात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मावळंगे येथील सामाजिक कार्यकर्ते बाबू मोरे यांनी केले आहे.
डांबरी रस्ता खचला
दापोली : वावघर गावातील भागणेवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्णत: खचल्याने वावघरातील ग्रामस्थांची रस्त्याअभावी मोठीच गैरसाेय निर्माण झाली आहे. धो-धो पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने हा डांबरी रस्ता मधोमध ३० मीटर पूर्णपणे खचला आहे.
मच्छिमार्केटची इमारत खचली
खेड : जगबुडी नदीकिनारी असणाऱ्या खेड शहरातील मटण-मच्छी मार्केटच्या नदीकडे बाजूचा इमारतीचा भाग मोठ्या प्रमाणावर खचल्याने विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेडमध्ये पावसाची संततधार सुरू असून, जगबुडी नदीला पूर आला आहे.