रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी या संस्थेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता पदांसाठी नियुक्ती करण्याकरिता पात्र उमेंदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
स्थापत्य, यंत्र, विद्युत अणुविद्युत,संगणक, मॅकेट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, उपयोजित यंत्रशास्त्र (शैक्षणिक अर्हता बी. ई. प्रथमश्रेणी), औषधनिर्माणशास्त्र (शैक्षणिक अर्हता बी.फार्म प्रथमश्रेणी), गणित (शैक्षणिक अर्हता एम. एससी. प्रथमश्रेणी) या अभ्यासक्रमांसाठी ही नियुक्ती होणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतिसह मंगळवार २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मुख्य इमारत (संबधित विभाग-स्थापत्य, विद्युत, उपयोजित यंत्रशास्त्र, गणित, औषधनिर्माणशास्त्र) आणि विस्तारित इमारत (संबधित विभाग-अणुविद्युत, संगणक, यंत्र, मॅकेट्रॉनिक्स) येथे उपस्थित रहावे, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औ. म. जाधव यांनी कळविले आहे.