रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी एका व्हिडिओद्वारे रत्नागिरीतील जनतेला आवाहन केले आहे़ कोरोनाची परिस्थिती आवाक्यात यावी यासाठी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन केले.
धबधब्यांवर बंदी
रत्नागिरी : तालुक्यातील रानपाट, शीळ, पानवल, निवळी या सर्व धबधब्यांवर नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे ही बंदी स्थानिक प्रशासनाने घातली आहे. याठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे़
गटारांची साफसफाई
रत्नागिरी : शहरात ज्या ठिकाणी गटारांवर खोके असतील अशा गटारांवरील साफसफाई लवकरच केली जाईल. ज्या ठिकाणी खोके असतील असे सर्व खोके हटवून गटारे साफ करणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले.
कार्यकारिणीवर निवड
रत्नागिरी : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये आत्मनिर्भर विभाग कोकण सहसंयोजकपदी डॉ. ऋषिकेश केळकर यांची निवड करण्यात आली आहे़ भाजपचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडून ही निवड करण्यात आली आहे़
नौकांची दुरुस्ती
रत्नागिरी : पावसाळ्यात सलग दोन महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे जिल्ह्यातील २५०० नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात येतात. मात्र, सध्या नौका, इंजिन, जाळ्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे दोन महिन्यांत मच्छीमार पूर्ण करतात.