राजापूर : तालुक्यातील कोदवली येथील सायबाच्या धरणाचे काम सुरू असलेल्या नव्या धरणाच्या कामासाठी वाढीव दराने होणाऱ्या रकमेची तरतुद करताना त्याकामी येणाऱ्या खर्चास सोमवारी ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
शहराला नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली सायबाच्या धरणाच्या ठिकाणी नवीन धरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या धरणाचे कामाची निविदा अंदाजपत्रकीय दरापेक्षा वाढीव दराची निविदा मंजूर केली असल्याने, वाढीव दराने होणाऱ्या रकमेच्या तरतुदीबाबत सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली, तर विविध प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी मंजुरीच्या पत्रावर मंजुरी दिलेल्या खर्चाचे बिलांना तसेच कामांना मंजुरी देण्यात आली. आगामी गणेशोत्सव सणाचे पार्श्वभूमीवर नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली, तर त्या कामी येणाऱ्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच शहरातील रस्त्यांची नावे बदलण्याबाबत देण्यात आलेल्या शासन निर्णयाचा विचार करून, त्याबाबत निर्णय घेण्यात आला.
तसेच नगरपरिषदेकडील दिव्यांग प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे दाखल करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली, तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकामी कामाला मंजुरी देण्याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला, तसेच जिल्हास्तर नगरोथ्यान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकामी कामांची निवड करण्यात आली आहे, तसेच दलित्तेर योजना व अल्पसंख्याक योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याच्या कामांची निवड करण्यात आली, तसेच नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकामी कामांची निवड करण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. ऑनलाइन पार पडलेल्या या सभेला नगरसेवक, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.