राजापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे व माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.या दौऱ्यांतर्गत तालुक्यातील सागवे, देवाचे गोठणे, केळवली, पाचल, ओणी, कोदवली, आदी भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागवार या बैठका घेण्यात आल्या.यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले. मागील वीस वर्षे राजापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सेनेची निर्विवाद सत्ता आहे.यापुढील प्रत्येक निवडणुकीत सर्व सहा विभागांमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचेच निवडून आले पाहिजेत. त्यासाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे व माजी आमदार गणपत कदम यांंनी पक्ष कार्यकर्त्यांना केल्या.राजापूर तालुका शिवसेनेच्या या झंझावाती दौऱ्यात तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, माजी आमदार गणपत कदम, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपजिल्हाप्रमुख अशोक सक्रे, उपतालुकाप्रमुख प्रकाश गुरव, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सरवणकर, राजापूर शहरप्रमुख अनिल कुडाळी, तालुका सहसंपर्कप्रमुख राजा नारकर, विभाग सहसंपर्कप्रमुख नाना मसुरकर, प्रदीप मांडवकर, दत्ताराम उर्फ बबन सकपाळ सहभागी झाले होते.राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शहर शिवसेनेचा मेळावा २८ तारखेला पार पडला. या मेळाव्याला जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती दूर्वा तावडे उपस्थित होत्या. राजापूर तालुका शिवसेनेच्या या दौऱ्यातील सर्व बैठकांना तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनी बहुमोल मार्गदर्शन करतानाच संघटनेला अधिक बळकटी देण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गाफील न राहता काम करावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)निवडणुका : गाफील न राहण्याचा इरादाजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षात होत आहेत. या निवडणुकांबाबत गाफील न राहता आणि युतीची शक्यता वगळून शिवसेनेने कामाला सुरुवात केल्याचे चित्र राजापुरात पाहायला मिळत आहे.
सेनेची निवडणूक तयारी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2016 10:12 PM