शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अमली पदार्थ विक्रेत्यांची रत्नागिरी पोलिसांनी उतरवली 'झिंग'; सुमारे ४ कोटींचा साठा जप्त

By अरुण आडिवरेकर | Published: December 06, 2023 5:16 PM

२५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : अमली पदार्थांच्या विळख्यातून जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी पाेलिसांनी धडक कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ महिन्यांत पाेलिसांनी एकूण ३९ कारवाया केल्या असून, अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या ७४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३ काेटी ७९ लाख ३५ हजार २१२ रुपयांचा १२८ किलाे ८६९ ग्रॅम इतका अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीचे जाळे माेठ्या प्रमाणात पसरले आहे. अमली पदार्थांचे वाढते जाळे राेखण्याकडे काही अंशी दुर्लक्ष झाले. त्यामुळे या ‘नशेली’ दुनियेत तरुणाई ओढली जाऊ लागली.  जिल्ह्यातील अमली पदार्थाची वाढती विक्री ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांचे हे पसरणारे जाळे राेखण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी धडक माेहीम हाती घेतली आहे.या माेहिमेंतर्गत फेब्रुवारी ते ऑक्टाेबर (एप्रिल वगळून) या आठ महिन्यांत ३९ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये गांजाबाबत २७, ब्राऊन हेराॅईनच्या ११, ॲम्फेटामाईन व टर्कीची प्रत्येकी एक तर चरसच्या दाेन कारवायांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये ६७ जणांकडे अमली पदार्थ सापडला असून, ७ जण सेवन करताना पाेलिसांना सापडले आहेत.पाेलिसांनी केलेल्या या कारवाईत ३ लाख ४२ हजार ९८२ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तसेच १९ लाख ९५ हजार ९८० रुपयांचे ब्राऊन हेराॅईन, ३ काेटी ५५ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा चरस, ९ हजार ४५० रुपयांचा टर्की आणि ५५ हजारांचा ॲम्फेटामाईन जप्त करण्यात आला आहे.गांजा सेवन करणारे १६पाेलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १६ जण गांजाचे सेवन करताना सापडले आहेत, तर ३५ जणांनी स्वत:कडे गांजा बाळगला हाेता. ब्राउन हेराॅइनजवळ बाळगलेले सात, ॲम्फेंटामाइन व चरस बाळगलेले प्रत्येकी चार तर एकाकडे टर्की हा अमली पदार्थ सापडला.२५ जणांच्या तडीपारीचा प्रस्तावअमली पदार्थाच्या विक्रीत सहभाग असलेल्या रेकाॅर्डवरील २५ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे गेले आहेत. त्यातील १४ जणांच्या प्रस्तावावर महिनाभरात निर्णय हाेणार आहे, तसेच तुरुंगात असणाऱ्या आराेपींना जामीन हाेऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जामीन मिळाला आणि त्यानंतर त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न हाेतील, असे जिल्हा अधीक्षक कुलकर्णी म्हणाले.

सर्वाधिक कारवाया रत्नागिरीतजिल्ह्यात १० ठिकाणी अमली पदार्थविराेधी कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाया रत्नागिरी तालुक्यातील करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहर हद्दीत १९ आणि ग्रामीण हद्दीत तीन अशा एकूण २२ कारवाया करण्यात आल्या आहेत, तर चिपळूणमध्ये सात, खेडमध्ये तीन, दापाेलीत दाेन आणि लांजा, नाटे, संगमेश्वर, सावर्डे, गुहागर येथे प्रत्येकी एक-एक कारवाई करण्यात आली आहे.

अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी धडक माेहीम हाती घेतली आहे. पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली असून, पडक्या इमारती, समुद्रकिनारे, निर्मनुष्य स्थळांच्या ठिकाणी पाेलिसांचा पहारा आहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगार व ज्यांचा अमली पदार्थ विक्रीत समावेश आहे.  अशांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही हाेईल. -धनंजय कुलकर्णी, जिल्हा पाेलिस अधीक्षक.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस