रत्नागिरी - ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये परराज्यातील एकूण २८ बोटी आश्रयाला आल्या आहेत . दोन दिवसात जिल्हा तसेच राज्याबाहेरील ५६ बोटी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर आल्या असून, त्यावरील सुमारे ६०० खलाशी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजूनही दोन दिवस सर्व बंदरांमध्ये तीन क्रमाकांचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीला शनिवार सायकांळपासून ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रविवारी समुद्रात भरकटलेल्या २८ बोटींना शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथे तटरक्षक दलाचे पोलीस आणि मत्स्य विभाग यांच्या सहकार्याने सुरक्षिन आणण्यात आले . या ३०९ खलाशी असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिली . त्यात आजच्या २८ बोटींची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यत बोटींची संख्या ५६ झाली आहे . यात तामीळनाडू _२६, कर्नाटक २, गोवा -२४, केरळ ३ आणि गुजरातच्या एका बोटीचा समावेश आहे.
सुमारे ६०० खलाशी आश्रयासाठी रत्नागिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:29 PM