शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

लेखापरीक्षकाला लाच घेताना अटक

By admin | Published: August 09, 2016 10:43 PM

‘लाचलुचपत विभागा’ची कारवाई : सरकारी कर्मचाऱ्यांकडेच मागितली लाच

रत्नागिरी : वार्षिक लेखापरीक्षणातील २० प्रतिकूल मुद्दे कमी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाच्या कनिष्ठ लेखा परीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. महेंद्र देवीदास नेवे (वय ४०, रत्नागिरी) असे या लाचखोराचे नाव आहे. रत्नागिरी लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई केली. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, नेवे याच्याविरोधातील तक्रार ही सरकारी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग कार्यालयाच्या २०१४-१५ वर्षातील लेखापरीक्षण अहवालात २० प्रतिकूल मुद्दे काढण्यात आले होते. हे मुद्दे कमी करण्यासाठी सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे कनिष्ठ लेखापरीक्षक महेंद्र नेवे यांनी ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीच्यावेळी नेवे यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती २० हजार रुपये लाच मागितली. ही रक्कम नेवे यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयात स्वत: येऊन पंचासमोर हे पैसे स्वीकारले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेवे यांना रंगेहात पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक तळेकर, सोनवणे, सहायक पोलिस फौजदार शिवगण, कदम, जाधवर, पोलिस हवालदार कोळेकर, सुतार, सुपल, ओगले, पोलिस नाईक भागवत, वीर, पोलिस शिपाई हुंबरे व नलावडे यांनी सहभाग घेतला. गेल्या आठ दिवसांत लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. (प्रतिनिधी)