रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल संस्थेचा ह्यथिबा राजवाडा संगीत महोत्सवह्ण दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रंगणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या महोत्सवाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवाबाबतची माहिती आर्ट सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्रुती सडोलीकर - काटकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर या कलाकारांच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव रंगणार आहे. २४ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम् नृत्य कीर्तनाने होणार आहे.
यावेळी सरस्वती सुब्रमण्यम या गायनसाथ, अतुल शर्मा हे बासरीसाथ तर सतीश कृष्णमूर्ती मृदुंगसाथ करणार आहेत. त्यानंतर श्रुती सडोलीकर - काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना अजय जोगळेकर हे संवादिनीसाथ, तर मंगेश मुळ्ये तबलासाथ करणार आहेत.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी रोजी युवा गायिका मुग्धा वैशंपायन यांचे गायन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध वादक अनंत जोशी हे संवादिनीसाथ, तर स्वप्नील भिसे हे तबलासाथ करणार आहेत. त्यानंतर संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पंडित भवानीशंकर यांची जुगलबंदी रंगणार आहे.महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता ह्यस्त्री ताल तरंग लय राग समर्पणह्ण हा कार्यक्रम रसिकांचे आकर्षण ठरणार आहे. घटमसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल या घटतरंग सादर करणार आहेत. कोलकाता संगीत रिसर्च अॅकॅडमीच्या माध्यमातून पंडित उल्हास कशाळकर हे महोत्सवाचा समारोप करणार आहेत.