अडरे : चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कनिष्ठ विभाग सांस्कृतिक विभागाच्या कला उत्सवाचे उद्घाटन प्रा. डॉ. डी. यु. खडसे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने क्राफ्ट दि आर्ट हे ५ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, मखर बनविणे, वारली पेंटिंग, एमसील व सिरॅमिक पेंटिंग तसेच घरगुती वस्तुंपासून शोभिवंत वस्तू बनविणे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्योती हणमंते यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ. खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध कला प्रकारांची ऐतिहासिक माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी मुलांना अशा प्रशिक्षण वर्गातून आपली कला जोपासण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुचय रेडीज, व्हाईस चेअरमन मंगेश तांबे, नियामक समितीचे सदस्य अविनाश जोशी, दलवाई उपस्थित होते. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर. आर. दांडेकर यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन प्रा. ढेरे यांनी केले. प्रा. यु. ए. कुलकर्णी यांनी ओळख करुन दिली. प्रा. सोहोनी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. दामले, प्रा. यादव, प्रा. एम. एम. तांबे, प्रा. धोपटे, प्रा. चौधरी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. जाधव, प्रा. वळ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
डी. बी. जे. महाविद्यालय (चिपळूण) येथील कला उत्सवाचे उदघाटन प्रा. डॉ. डी. यु. खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. एल. ए. बिरादार, जे. ए. शिकलगार, मंगेश तांबे, सुचय रेडीज, डॉ. श्याम जोशी उपस्थित होते.