शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

वेराॅन समूहाचा रत्नागिरीतील भूखंड जप्त, ईडीची कारवाई; तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 12:53 PM

कंपनीच्या विस्तारासाठी बँकांकडून घेतले होते कर्ज

रत्नागिरी : बँकांकडून कर्ज घेत तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणेस्थित वेरॉन समूहाची पुणे, नागपूर, रत्नागिरी आणि गोवा येथील १२ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे. कंपनीचा आतापर्यंतच्या जप्तीचा आकडा १७९ कोटी २७ लाख रुपयांवर पोहोचला आहे.उपलब्ध माहितीनुसार, कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांकडून कंपनीच्या विस्तारासाठी कंपनीचे प्रवर्तक एस. पी. सवईकर (आता मृत झालेले) यांनी कर्ज घेतले होते. कालांतराने हे कर्ज थकले; परंतु तरीही काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या रकमेचे ‘लेटर ऑफ क्रेडिट’ मिळवले होते.या माध्यमातून कंपनीला जे पैसे मिळाले, त्या पैशांचा वापर कंपनीने विस्तारासाठी न करता त्यातून काही प्रमाणात जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला; तर उर्वरित पैसे अन्य ठिकाणी फिरवत वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, यातील आर्थिक व्यवहारांची मर्यादा पाहता गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

प्राथमिक तपासादरम्यानच कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचे दिसून आल्यावर ईडीने १६६ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे; तर त्यानंतर अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतर ईडीने कंपनीची आणखी १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या जप्तीच्या कारवाईमध्ये नागपूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील भूखंडांचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbankबँक