रत्नागिरी : पावस (ता. रत्नागिरी) येथील अनसूया आनंदी वृद्धाश्रमाला येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध प्रकारची मदत करण्यात आली. शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून या मदतीचे वितरण करण्यात आले. बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सी.एम.ए. उदय बोडस यांचे दिवगंत बंधू सी.ए. रवींद्र बोडस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वृद्धाश्रमाला वैद्यकीय मदतीसाठी धनादेश देण्यात आला. सर्व वृद्ध महिलांना पौष्टिक आहार म्हणून सुक्यामेव्याचे मऊ लाडू, घरगुती भडंग, बटाटा वेफर्स, केळी आणि राजगिरा लाडू देण्यात आले.
कै. अनसूया रामचंद्र बोडस यांचे स्मरणार्थ वृध्दाश्रमात राहणाऱ्या सर्व महिलांना मायेची शाल पांघरून त्यांचा आदर करण्यात आला. यासाठी उदय बोडस यांच्या आई सुमित्रा बोडस आणि ट्रस्टच्या खजिनदार आदिती पटवर्धन यांनी शाली दिल्या आहेत. अनसूया आनंदी वृद्धाश्रमाच्या वतीने व्यवस्थापिका अरुणा कदम यांनी या मदतीसाठी बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले आहेत.
फोटो मजकूर
अनसूया आनंदी वृद्धाश्रमातील महिलांना बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सी.एम.ए. उदय बोडस यांनी शाल पांघरून त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला.