कोल्हापूर : मुंबई - भुईपावडा येथील नवभारत विद्यालयाच्या ३५ माजी विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील घोडके कॉलनी परिसरातील पूरग्रस्त लोकांना मदत करून या सत्कार्यात खारीचा वाटा उचलला आहे.मुळचे चिपळूण-गाणेखडपोली येथील सध्या मुंबई येथे वास्तव्याला असलेले राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन सुमारे ५० हजार पेक्षा अधिक रुपयांची मदत केली.
यामध्ये चटई, खराटे, ब्लिचिंग पावडर, साड्या, लहान मुलांचे कपडे, शालेय साहित्य, डेटॉल, कोलगेट, साबण, लायझॉल, फेसमास्क आदींची मदत त्यांच्याकडून कोल्हापूर येथे पाठविण्यात आली. त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते शाम नायर, शरद रसाळ, सुरेंद्र मोटे, अमर घोडके, अजय पाटील, अक्षय कदम, सुरज गायकवाड यांनी ही मदत घोडके कॉलनी, चिखलवाडी, बापट कॅम्प, काटेमळा, तसेच मुक्त सैनिक वसाहतीतीसह पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली. याचबरोबर पाच शाळेंनाही स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कीट देण्यात आले.चिपळूण येथील रणजीत आवळे, विशाल पवार, दीपक माळकर, प्रसाद भांबुरे, विकास चव्हाण, अमित जाधव या सहा मित्रांनीही तांदूळ ५०० किलो व २०० किलो तूरडाळ ही जोतिबा-पन्हाळा रोडवरील चिखली गावात तसेच मुक्त सैनिक परिसरात दिली.