लांजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. लांजा येथे नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा घेऊन पंचायत समिती ते लांजा तहसीलदार असा निषेध मोर्चा काढण्यात आला. हा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता पाेलिसांनी ताे काढून घेतला.
लांजा येथे दुपारी पंचायत समिती लांजा कार्यालय येथून मंत्री नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा घेऊन ‘अटक करा, अटक करा, नारायण राणे यांना अटक करा’, ‘शिवसेनेचा विजय असो’, अशा जोरदार घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर येऊन धडकला. त्यानंतर प्रांत अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार अमोल कदम यांची भेट घेऊन शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, युवा तालुका अधिकारी प्रसाद माने, लांजा सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी, माजी सभापती लीला घडशी, नगरसेविका पूर्वा मुळे, वंदना काटगाळकर, राजू हळदणकर, दुर्वा भाईशेट्ये, शरद चारकरी, संजय पाटोळे, पंढरी शेट्ये, राहुल शिंदे, वैभव जोईल, युवराज हांदे, सचिन डोंगरकर, शाम खानविलकर, सचिन माजळकर, दिलीप पळसुलेदेसाई, रूपेश सुर्वे, मोहन तोडकरी, लहू कांबळे, दीपू जुवेकर, विकास मांडवकर, लक्ष्मण मोर्ये, दीपक कदम, रसिका मेस्त्री, धर्मेंद्र पाल्ये सहभागी झाले होते.