रत्नागिरीकुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या रत्नागिरी येथील मालमत्तेचा अखेर लिलाव करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी तब्बल १ कोटी १० लाखांना दाऊदची मालमत्ता खरेदी केली आहे. दाऊदच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा ऑनलाइन लिलाव मंगळवारी मुंबईत पार पडला यात रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावली.
स्मगलिंक अँड फॉरन एक्स्जेंज मॅनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर या जागेची किंमत १ कोटी ९ लाखांच्या घरात निश्चित करण्यात आली होती. याआधी १० नोव्हेंबरला दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. पण रत्नागिरीतील जागेचा लिलाव होणं शिल्लक होतं. अखेर १ डिसेंबर रोजी या जागेचा लिलाव करण्यात आला आहे. याआधी दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती.