रत्नागिरी : वानर, माकडांचा बंदोबस्त करता येत नसेल तर शेतकऱ्यांना आत्मत्येची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन अविनाश काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे. वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी आणि बागायतदार प्रचंड त्रासलेले आहेत. वानर, माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेती, भाजीपाला, बागायती करणे म्हणजे डोक्यावर कर्ज वाढवणे अशी परिस्थिती आहे.
वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात. शासन आणि प्रशासन याचा विचार करणार आहे की, नाही ? जिल्ह्यातील शेती क्षेत्रात एक हजार हेक्टर घट झाल्याची अधिकृत कृषी कार्यालयीन आकडेवारी आहे. प्रत्यक्षात घट झालेले क्षेत्र त्यापेक्षा जास्तच असेल. त्याचे कारण कृषी अधिकारी यांनी वन्यप्राणी उपद्रव हेच दिले आहे.
केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.