अडरे : चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतीने नियम पाळा, गावात कोरोना टाळा, कोरोनाला हद्दपार करा, असे आवाहन करून रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुुरुवात केली आहे.
शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळी गावात कोरोनाचे काही रुग्ण आढळले. गावात कोरोनाच पसार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून गावात औषध फवारणी करण्यात आली हाेती. तसेच रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, ताप, सर्दी किंवा काही आजार उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, दुकाने बंद करा, अन्यथा दंडाची कारवाई केली जाईल अशा सूचनाही देण्यात आल्या.
या उपक्रमात सरपंच कासम दलवाई, उपसरपंच गणेश निवाते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाराम साळवी, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, संदीप जाधव, रुचिता पवार, मुमताज दलवाई, प्रचिती भैरवकर, माधुरी सकपाळ, तलाठी सतीश जाधव, पोलीस पाटील नंदिनी पवार आशासेविका गीता पवार, राजेश जाधव, मिलिंद सकपाळ उपस्थित होते.