शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

परतीच्या प्रवासाची एसटीकडून सज्जता

By admin | Published: August 29, 2014 10:14 PM

के.बी. देशमुख : ८१० गाड्यांचे आरक्षण

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर गावाकडे परतली आहेत. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी.कडून सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत परतीच्या ८१० गाड्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी यावेळी दिली. गणेशोत्सव म्हणजे सर्व सणांचा राजा. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. यावर्षी कोकणात १९१३ जादा गाड्या आल्या असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २१३ गाड्या अधिक आल्या आहेत. रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या आल्या आहेत. अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळला असला तरी गणपतीसाठी कोकणात खासगी कार, गाड्याने येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर गर्दी दिसूून येत आहे. एस. टी.ची वाहतूक मात्र नेहमीच्याच मार्गावरून सुरू आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून १९१३ जादा गाड्या प्रवाशांना घेऊन आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी ८१० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.दररोजच्या १५० गाड्यावगळता दि. ४ ते १० सप्टेंबरअखेर ८१० गाड्यांचे एस. टी. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. दि. ४ रोजी ८१, दि. ५ रोजी २००, दि. ६ रोजी २९०, दि. ७ रोजी १५०, दि. ८ रोजी ५०, दि. ९ रोजी ३०, दि.१० रोजी ९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. दि. ६ रोजी सर्वाधिक गाड्या मुंबईकडे सोडण्यात येणार आहेत. प्रत्येकाला तिकीट मिळण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त मुंबईहून तसेच बाहेरून येणार, हे गृहित धरून एस. टी. प्रशासनाने भक्तांसाठी येणाऱ्या व परतीच्या गाड्यांचे चोख नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)