रत्नागिरी : मुंबईतील बांद्रा टर्मिनस येथून सुटणारी व बोरिवली-वसईमार्गे कोकणात जाणारी बांद्रा टर्मिनस ते मंगळुरू रेल्वे गाडी १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रात बांद्रा ते वसई विरार परिसरात राहणाºया कोकणातील लोकांना या नवीन गाडीचा लाभ होणार आहे. १६ एप्रिल ते ४ जून २०१९ दरम्यान ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे.
बांद्रा मुंबईपासून ते वसई विरारपर्यंतच्या उपनगरी भागात राहणाºया कोकणातील लोकांना कोकणात त्यांच्या गावी येण्यासाठी दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच कुर्ला टर्मिनस येथे रेल्वेसाठी जावे लागत होते. त्यामुळे या उपनगरी भागातील लोकांची मोठी गैरसोय होत होती. बोरिवली - वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी रेल्वे असावी, ही त्या परिसरातील लोकांची मागणी होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. उपनगरातील कोकणवासियांच्या प्रयत्नाला यश आले असून, कोकण रेल्वे जागृत संघ, मुंबई (नियोजित) यांनी यासाठी पाठपुरावा केला. बांद्रा टर्मिनसवरून ही गाडी क्र. ०९००९ रात्री ११.५५ वाजता मंगळुरूकडे रवाना होऊन दुसºया दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरूला पोहोचते, तर मंगळुरूहून रात्री ११ वाजता सुटून दुसºया दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता बांद्रा टर्मिनसला पोहोचते.
मुंबई-रत्नागिरी स्पेशल
सीएसएमटी ते रत्नागिरी अशी विनाआरक्षित १२ बोगींची विशेष रेल्वे फेरी २१ एप्रिल (रविवार) रोजी मुंबईतून रात्री ००.३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रत्नागिरीत सकाळी ८.४५ वाजता पोहोचेल. रविवारी दुपारी १२.३० वाजता ही गाडी मुंबईला रवाना होईल.