रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळात व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारी निकड असो वा वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच कृषी उपक्रमांतर्गत आवश्यक असणारी रक्कम उभी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी नवीन महा सोनेतारण कर्ज योजना जाहीर केली आहे.
यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त कर्ज आणि तेही कमीतकमी व्याजदरात, अर्थात शेतीसाठी ७.३० टक्के आणि इतरांसाठी ७.३५ टक्के वार्षिक दराने देण्याची व्यवस्था केली आहे. कमीतकमी आणि सोप्या दस्तऐवजासह केवळ १५ मिनिटांत कर्ज मंजुरी हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र, रत्नागिरी शाखेचे मुख्य प्रबंधक आनंद डिंगणकर यांनी केले आहे.
ही योजना बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असून, ग्राहकांनी आपल्या जवळच्या शाखेशी त्वरित संपर्क साधावा, असेही डिंगणकर यांनी कळविले आहे.
ही बातमी जाहिरातदाराची आहे.